✕
अलिबागमधील १९ बंगल्यांचे घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत?
By EditorialPublished on
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जमिनीवर १९ बंगल्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
_202302251501300069.jpg)
x
_202302251501300069.jpg)
अलिबाग : मुरुड (Murud) तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जमिनीवर १९ बंगल्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी (Village Panchayat Officer) व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई (Korlai) येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. एफायआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६ ४६८ आणि ३४ अन्वये तत्कालीन तीन ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत. किरीट सोमय्या यांचा असाही आरोप आहे की २००८ मध्ये या जागेवर ग्रामपंचायतीने बंगले बांधल्याचं सर्टिफिकेट दिलं असताना शिवाय त्याचा टॅक्स भरला जात असताना अचानक २०२२ मध्ये रेकॉर्ड मध्ये बंगलेच नाहीत असं कसं काय दाखवता येतं. आजची या बंगल्यांची रेडी रेकनर दराने तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी रक्कम आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंनी रेकॉर्डमध्ये दाखवलेले नाही याचाच अर्थ ती संपत्ती बेनामी संपत्ती आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना किरीट सोमय्या यांनी वारंवार आरोप करुन देखील तक्रार घेण्याशिवाय कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र आता याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Editorial
Next Story
Related News
X
