✕
राज्यातील सत्तासंघर्षावर २८ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
By EditorialPublished on
सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सलग तीन दिवस सुरू असलेली सुनावणी आज एक तास आधीच संपली. आता पुढची सुनावणी २८ फेब्रुवारी पासून होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Y. Chandrachud), न्या. एम. आर. शहा (M.R. shah), न्या. कृष्ण मुरारी (Krishna Murari), न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohli), न्या. पी. एस. नरसिंहा (P. S. Narasimha) या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून जवळपास अडीच दिवस अॅड. कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibal)

x

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सलग तीन दिवस सुरू असलेली सुनावणी आज एक तास आधीच संपली. आता पुढची सुनावणी २८ फेब्रुवारी पासून होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Y. Chandrachud), न्या. एम. आर. शहा (M.R. shah), न्या. कृष्ण मुरारी (Krishna Murari), न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohli), न्या. पी. एस. नरसिंहा (P. S. Narasimha) या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून जवळपास अडीच दिवस अॅड. कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाकडून अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
आज एक तास आधीच सुनावणी संपली. आता पुढच्या आठवड्यात पुन्हा तीन दिवस सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यानुसार ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षावरील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले. जर, बहुमत चाचणीला सामोरे गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे.
आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांनी घेतलेली भूमिका या सर्व घटकांवर जोरदार युक्तिवाद झाला. राज्यपालांचेही राजकीय लागेबांधे असतात, याकडेही अभिषेक मनु संघवींनी घटनापीठाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, असे थेट बोट दाखवणारा युक्तिवाद अभिषेक मनु संघवींनी केला. परंतू घटनापीठाचे कामकाज आज दुपारी तीन वाजेपर्यंत चालले. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या अटकेबद्दलचे प्रकरण तातडीने ऐकण्यासाठी सरन्यायाधीश दुसऱ्या बेंचमध्ये असणार आहेत. त्यामुळे आज एक तास आधीच युक्तिवाद संपला
अडीच दिवसांच्या युक्तिवादाची सिब्बलांकडून भावनिक सांगता
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला. आजही (२३) त्यांच्याच युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजही कपिल सिब्बल यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले. तसेच मी ही केस जिंकेन किंवा हरेन. त्यासाठी इथे उभा नाही, तर घटनात्मक नैतिकता टिकून राहावी, जी आपण देशात १९५० पासून रुजवत आलो आहोत, यासाठी मी उभा आहे, असे म्हणत त्यांनी आजच्या युक्तिवादाची भावनिक सांगता केली.

Editorial
Next Story
Related News
X
