Raja Thakur Wife - Sanjay Raut
ठाणे, दि. २२ (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे. ही सुपारी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला
होता.
त्यांच्या या आरोपांवर आता राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर (Pooja Thakur) यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जाऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या पतीला गुंड ठरवणारे संजय राऊत कोण? असे म्हणत पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केले त्याविरोधात मी पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे, असे पूजा ठाकूर यांनी सांगितले. राऊत यांच्या विधानाची दखल घेऊन त्याचा तपास करावा. तसेच राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूजा ठाकूर यांनी पोलिसांकडे केली आहे.
पूजा ठाकूर प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाल्या, माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांनी प्रुफ आणावा मग बोलावे. मी याआधी शिवसेनेकडून (Shiv Sena) निवडणूक लढले आहे. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यांनी मला उमेदवारी दिली होती.
शिवसेनेकडून निवडणूक लढले तेव्हा माझे पती समाजसेवक म्हणून त्यांना चालत होते. आत त्यांना ते गुंड दिसत आहेत. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती मला समाजकार्यात मदत करत असतात. हीच आमची ओळख आहे. या गोष्टीचा पाठपुरावा करत राहून न्यायाची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (HM Devendra Fadnavis) यांच्याकडे करणार असल्याचे पूजा ठाकूर यांनी म्हटले.
Editorial

Editorial

Next Story