HSC Board Exam; the answer was printed on the question paper
मुंबई, (प्रतिनिधी) : बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर छापून कॉपीमुक्त अभियानाचा डांगोरा पिटणाऱ्या परीक्षा बोर्डाने नवा पराक्रम केला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जाण्याची शक्यता आहे.
आजपासून राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने आता बोर्डाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक ३ इंग्रजी कवितेववर आधारित होता. प्रश्न क्रमांक ३ मधील उप प्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे. या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात ३१९५ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २१,३९६ कर्मचारी कार्यरत असतील. तर २७१ भरारी पथके
संपूर्ण राज्यभरात परीक्षे दरम्यान काम करतील. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
Editorial

Editorial

Next Story