✕
कधीही मिंधे होऊ नका - राज ठाकरे
By EditorialPublished on
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आपण शिवरायांचे वारसदार आहोत, हे कधी विसरू नका. मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा. मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जातीपाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू (Marathi and Hindu)

x

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी ): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सडेतोड बोलण्यासाठी सर्वांना परिचित आहेत. ते आपल्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज राज ठाकरे यांनी मुंबईतील व्हिीजेटीआय महाविद्यालयात (VJTI College) आयोजित कार्यक्रमात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी उच्चारलेला एक शब्द चर्चेत आला आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आपण शिवरायांचे वारसदार आहोत, हे कधी विसरू नका. मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा. मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जातीपाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू (Marathi and Hindu) आहोत येवढं फक्त लक्षात ठेवा. असा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आपण म्हणतो मराठेशाहीने काय केलं तर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. मराठा साम्राज्य पाकिस्तानातील अटोक किल्ल्यावर झेंडे फडकवले. आपण या लोकांचे वापसदार आहोत हे विसरू नका आणि कधी कोणासमोर मिंधे होऊ नका, असा सल्ला राज यांनी दिला. वास्तविक उद्धव ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांना मिंधे म्हणून संबोधतात. त्यामुळे राज ठाकरेंचा टोला शिंदे गटाला तर नव्हता ना, अशी चर्चा सुरू झाली आहे

Editorial
Next Story
Related News
X
