✕
राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच - उद्धव ठाकरे
By EditorialPublished on
काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

x

मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली प्रशांत भूषण यांनी दाखल केलेला आहे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. न्याय यंत्रणा आपल्या दबावाखाली कशी येईल, त्यासाठी मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री बोलत आहे. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. देशातील लोकशाही संपलेली आहे. आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. येत्या २१ तारखेपासून याबाबत सलग सुनावणी सुरू होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी म्हणालो होतो की न्यायालयाकडून निकाल दिला जात नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाच्या बरोबर आहे. कोणाच्या बरोबर आहे, हे केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर कोणीही धनाढ्य माणूस निडवून आलेले खासदार, आमदार विकत घेऊन पक्षाच सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हेदेखील मी मागे बोललेलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
प्रशांत भूषण यांनी दाखल केलेला न्यायालयात एक खटला सुरू केला आहे. न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्याची गरज वाटत आहे. चोराला राज्यमान्यता देणं हे भूषणावह वाटत असेल. मात्र चोर हा चोरच असतो.

Editorial
Next Story
Related News
X
