✕
ट्रॅकवर रॉड उभे केले, मध्ये दगड रचले सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला लोको पायलटने वाचवले प्रवाशांचे प्राण
By EditorialPublished on
दयपूर, (वृत्तसंस्था) : लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे उदयपूर- जयपूर (Udaipur- Jaipur) सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) मोठी दुर्घटना टळली. वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅ कवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली.

x
उदयपूर, (वृत्तसंस्था) : लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे उदयपूर- जयपूर (Udaipur- Jaipur) सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) मोठी दुर्घटना टळली. वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅ कवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वे रुळावर मोठी दगडे आणि इतर गोष्टी दिसल्यानंतर त्याने तातडीने रेल्वे थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती जीरआरपीला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उदयपूर ते जयपूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सोमवारी चित्तोडगड जिल्ह्यातील सोनियाना गांगरार येथे पोहोचली. तेव्हा लोको पायलटला ट्रॅकवर दगड दिसले. दगड पाहिल्यानंतर पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले. यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. समाजकंटकांनी रुळांवर मोठमोठे दगड, बार टाकले होते. गाडी वेळेत थांबवली नसती तर रुळावरून घसरण्याची शक्यता होती. या अपघातामागे कोणाचे षडयंत्र आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
- udaipur jaipur vande bharat express train accident train derailment locomotive pilot chittorgarh railway tracks emergency braking railway station passengers derailment prevention railway authorities safety measures incident track reversal alertness emergency response rajasthan railway incident investigation

Editorial
Next Story
Related News
X
