✕
शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा 'आझाद मैदानात होणार !
By EditorialPublished on
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : दसरा मेळावा (Dussehra gathering) आझाद मैदाना (Azad Maidan) वर घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून (Shinde Group) घेण्यात आला आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान (Cross Maidan) आणि आझाद मैदान (Azad Maidan) ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती.

x
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : दसरा मेळावा (Dussehra gathering) आझाद मैदाना (Azad Maidan) वर घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून (Shinde Group) घेण्यात आला आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान (Cross Maidan) आणि आझाद मैदान (Azad Maidan) ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण क्रॉस मैदानावर क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.
दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी यंदा देखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला.
मागील वर्षी शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं.
- mumbai azad maidan dussehra celebration shivaji park controversy decision shift cricket ground event shiv sena cross maidan dussehra celebrations political dispute location change mumbai news public opinion festival shivaji maharaj bmc permissions park dispute civic authorities local news event venue mumbai politics community public gathering event relocation mumbai dussehra controversy

Editorial
Next Story
Related News
X
