Maharashtra Toll Scam
प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल (Toll) वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र (Maharashtra) नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, आपलं टोलचं आंदोलन २००९-१० च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्याना हे टोल मिळतात कसे? यानंतरही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. त्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधीत जुने सात व्हिडिओ दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या.
व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधण आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
त्यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला महिन्याला या टोलमधून पैसे जातात. यामुळे टोल बंद केले जाणार नाहीत. यातून तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. हे लोकं थापा मारतात आणि पुन्हा यांनाच मतदान केलं जातं हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील टोलदरवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात चार दिवस उपोषण केले. राज ठाकरे यांनी काल त्यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळीदेखील राज ठाकरे यांनी टोलवसुलीवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यात दुचाकी, तीनचाकी व प्रवाशांच्या खासगी चारचाकीवर टोल आकारला जात नाही. केवळ व्यावसायिक वाहनांवर टोल आकारला जातो. फडणवीसांच्या या वक्तव्याचा राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला.
पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, तुम्ही तुमच्या वाहनांनी येथे आला आहात.. तुम्ही टोल दिला की नाही? राज्यात चारचाकी वाहनांवर सर्रास टोलवसूल केला जातो की नाही? त्यावर पत्रकारांनी हो म्हणताच राज ठाकरे म्हणाले, याचा अर्थ काल फडणवीस जे बोलले ते धांदात खोटे होते. ते इतके थापा मारता हे अनाकलनीय आहे. मला तर लोकांचा प्रश्न पडला आहे. ते एवढे खोटे ऐकून कसे घेतात. म्हणूनच मी म्हणतो टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे.

Editorial

Editorial

Next Story