✕
राज्यपालांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली
By EditorialPublished on
संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. राज्यपालांवर टीका करताना संजय राऊत यांच्या तोंडून पुन्हा शिवराळ भाषा निघाली आहे. सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा मंत्री याविरोधात उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात येईल आणि शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल. पण जो हा अपमान करत आहेत ते XXXX अवलाद आहेत, असे बोलत संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर

x

मुंबई, दि. ८ ( प्रतिनिधी) : राज्यपालांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. राज्यपालांवर टीका करताना संजय राऊत यांच्या तोंडून पुन्हा शिवराळ भाषा निघाली आहे. सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा मंत्री याविरोधात उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात येईल आणि शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल. पण जो हा अपमान करत आहेत ते XXXX अवलाद आहेत, असे बोलत संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केला. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेची स्थापना केली होती. त्या सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. ३० ते ३५ लोक सोडून गेले, आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. त्यांना आम्ही तिकीट दिलं, ते सोडून गेले म्हणजे पक्ष गेला नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X
