Raj Thackeay
पुणे, दि. ८ (वार्ताहर ) : महाराष्ट्राचे सध्याचे घसरलेले राजकारण (Politics) दिशाहीन झाले आहे. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलिकडे काही दिसत नाही.
महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. मात्र माध्यमांत राऊत काय बोलले, राणे काय बोलले, हेच सुरू आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज माध्यमांचेही कान टोचले.
पुण्यात (Pune) सुरू असलेल्या १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) एका मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली जात आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. कोणी कशावरही बोलायला लागले आहेत. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सर्व टीव्हीवर दाखवले जात आहे. सध्या राज्यात सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरु आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर हे पाहून राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात असल्याचेहही ते म्हणाले.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवरही राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून एखाद दुसरे उद्योग इतर राज्यात गेल्याने काही फरक पडत नाही. दर्या मे खसखस. महाराष्ट्राने आहे ते टिकवून ठेवले तरी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत, म्हणून केवळ गुजरातला (Gujrat) प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. संघराज्य आहे, तर मग सर्व राज्यांना न्याय द्यायला हवा.
राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केलेत
शिवसेना खासदार विनायक राऊतांचा थेट हल्ला

MP Vinayak Raut
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना एकदोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केले आहेत. महाराष्ट्रातून दोन नाही तर पाच मोठे उद्योग (Industry) गुजरातमध्ये गेले. त्या उद्योगांच्या जिवावर भाजपने (BJP) गुजरातची निवडणूक जिंकली, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. राज्यातले प्रकल्प (Project) राज्याबाहेर नेले आणि महाराष्ट्राला कंगाल केले. राज ठाकरे यांना त्यावर बोलायला वेळ नाही हे मनसेचे दुर्दैव, अशी टीका राऊत यांनी केली.
Editorial

Editorial

Next Story