Urfi Javed
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : या अशा उघड्या नागड्या मुली महाराष्ट्रात चालणार नाही. हे आम्ही खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रात हा नंगानाच चालू देणार नाही. ज्यादिवशी ती मला भेटेल तर तिला मी थोबडवून काढेन, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी रविवारी उर्फी जावेद विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिनेही वाघ यांच्यावर प्रतिउत्तरात टीका केली आहे. यावर उर्फी जावेदला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, आम्ही काय काम करतोय याबाबत मला उर्फीसारख्या उर्फट बाईला सांगायची गरज वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच याठिकाणी चालू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मला या उर्फ बाई विषयी माहितही नव्हते मात्र एका ९ वर्षीय मुलीच्या आईने जिच्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या आईने मला याविषयी सांगितले की ताई, मुंबईच्या रस्त्यांवर काय सुरुय बघा.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना मला विचारायचंय, तुम्हाला लाज वाटत नाही का? स्वातंत्र्याच्या नावाखाली किती स्वैराचार माजवलाय हा... चार भिंतीच्या आत तुम्ही उघडे नागडे नाचा... आम्हाला काही देणंघेणं नाही. पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वागणार तर आम्ही तुम्हाला त्याच ठिकाणी प्रसाद देणार... आज मी ट्विट करुन कारवाईची मागणी केली आहे. ज्या दिवशी ती माझ्या हातात सापडेल त्यादिवशी मी तिला थोबडवणार म्हणजे थोबडवणार... अशी धमकी वजा आव्हान वाघ यांनी दिले आहे.
Editorial

Editorial

Next Story