Ajit Pawar - Chitra Wagh
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : कुठलाही विषय नसताना अजितदादा छत्रपती संभाजी महाराजांवर का बोलले? याला मुद्दाम समाजातील वातावरण गढूळ करणे म्हणतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर सर्व बाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र अजित पवारांवर जोरदार टीका केली.
मागे राहुल गांधीच्या सद्भावना प्रेमाच्या कुठल्या यात्रेसाठी ते आले होते आणि सावरकरांबद्दल बोलून त्यांचा अपमान करुन निघून गेले.. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या अतुलनीय पराक्रमाने ते मुघलांना कसे सामोरे गेले, त्यांनी काय काय भोगलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि अशा वेळेला अजितदादांसारख्या प्रगल्भ नेत्याने ते धर्मवीर नव्हते असे म्हणणं दुर्दैवी आहे.
Editorial

Editorial

Next Story