✕
रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
By EditorialPublished on
पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलिस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी

x

अलिबाग, दि. १ (वार्ताहर) : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस याप्रकरणात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतात का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलिस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही मातोश्रीसाठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिला अहवाल आला त्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची बाब कबूल केली. २०२२ मध्ये दबावामुळे आम्ही १९ बंगल्यासंदर्भातील तपशील मिटवल्याची कबुली त्यांनी दिली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केली आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
१९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा उकरून काढले
रेवदंडा पोलिस ठाण्यात ठाकरे आणि वायकर परिवारावर आयपीसी भारतीय दंड संहिता कलम ४१५, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत अन्वये तक्रार दाखल केली आहे. इंडियन पिनल कोड मधील ३४ आणि ग्रामपंचायत रेकॉर्डच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीची नोंद खोटी करणे आणि ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कृत्य करणे. त्यानुसार त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.
इंडियन पिनल कोड मधील ३४ आणि ग्रामपंचायत रेकॉर्डच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीची नोंद खोटी करणे आणि ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कृत्ये करणे. त्यानुसार त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी १ जानेवारीला आपण रेवदंडा पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे आणि वायकर यांचा कोर्लई अलिबागच्या १९ बंगल्यांच्या घोटाळा' प्रकरणी तक्रार करण्यासाठी जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे, अन्वय नाईकांनी २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने १९ बंगले बांधले होते. त्यांनी दरवर्षी (२००९, २०१०, २०११, २०१२, २०१३) नियमीतपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरणा केली. २०१४ मध्ये ठाकरे व वायकर परिवाराने अन्वय नाईकांकडून सदर जमिनी बंगल्यांसह स्वतःच्या नावे विकत घेतले. ठाकरे परिवाराने या १९ बंगल्यांसाठी २०१३ ते २०२१ या ८ वर्षांची घरपट्टी भरली. ११ नोव्हेंबर २०२० रोजी घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ठाकरे सरकार, मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून या १९ बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकल्या. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Editorial
Next Story
Related News
X
