भारताने (India) पहिल्या वनडे (ODI) सामन्यात श्रीलंकेसमोर (Sri lanka) ५० षटकात ७ बाद ३७३ धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) ८७ चेंडूत ११३ धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो ६७ धावात ८३ धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने (Shubman Gill) देखील ७० धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने १० षटकात ८८ धावा देत ३ बळी टिपले.


India vs Sri lanka First Odi
नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) : भारताचे ३७४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) पहिल्या ५ षटकातच दोन धक्के दिले. सिराजने अविष्का फर्नांडोला ५ तर कुसल मेंडीसला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था ५.३ षटकात २ बाद २३ धावा अशी केली. यानंतर उमरान मलिकने (Umran Malik) देखील चरिथ असलंकाला २३ धावांवर बाद करत लंकेला तिसरा धक्का दिला. यानंतर सलामीवीर पथुन निसंका आणि धनंजया डि सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. निसंकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोहम्मद शमीने धनंजया डि सेल्वाला ४७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
तत्पूर्वी, भारताने (India) पहिल्या वनडे (ODI) सामन्यात श्रीलंकेसमोर (Sri lanka) ५० षटकात ७ बाद ३७३ धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) ८७ चेंडूत ११३ धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो ६७ धावात ८३ धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने (Shubman Gill) देखील ७० धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने १० षटकात ८८ धावा देत ३ बळी टिपले.
Editorial

Editorial

Next Story