✕
थर्टी फर्स्टआधीच पुण्यात १ कोटी ७० लाखांची विदेशी दारू जप्त
By EditorialPublished on
नवीन वर्षाच्या स्वागताला एक दिवस उरला असताना थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. तसेच २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ७ आरोपींमधील काही जणांवर या आधी देखील अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गु

x

पुणे, दि. २९ (वार्ताहर) : नवीन वर्षाच्या स्वागताला एक दिवस उरला असताना थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. तसेच २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ७ आरोपींमधील काही जणांवर या आधी देखील अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोन्ही ट्रकमधून दारू गोव्यातून निघून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात होती. मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तर वास येण्याची शक्यता असते. पोलिसांना या प्रकाराचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी शक्कल लढवली होती. त्यांनी ट्रकभर डांबराच्या गोळ्या पसरवून ठेवल्या होत्या. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिताफीने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई केली. नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची राज्यात करडी नजर आहे. अवैध दारु विक्री आणि जुगार अड्डयांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दरवर्षी पुण्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारु विक्रीसाठी आणली जाते.
Next Story
Related News
X

