black belt ban

नागपूर, दि. (वार्ताहर) : बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे... बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है... कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब... कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध... लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय.
काळ्या पट्टा बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू - अजित पवार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावरुन निर्वाणीचा इशाराच यावेळी दिला.

Editorial

Editorial

Next Story