मुंबई : राज्यभरात पैमान घालणाऱ्या जीबीएस (गुलेन-बरे सिंड्रोम) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. पुणे सोलापूरनंतर मुंबईतही जीबीएस आजाराने शिरकाव केलेला पाहायला मिळतोय. मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा जीचीएस सिंड्रोम विषाणुमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण वडाळा परिसरातील रहिवासी होता. जीचीएसमुळे मृत्यू झालेला रुग्ण मुंबई महानगरपालिकेतील बीएन देसाई रुग्णालयात चॉर्डबॉय म्हणून काम करत होता. नायर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण बऱ्याच काळापासून आजारी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जीबीएसची लागण असलेली एक अल्पवयीन मुलगीदेखील नायर रुग्णालयात दाखल आहे. ही मुलगी पालघरची असून दहावीची विद्यार्थिनी आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात जीबीएसचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे राज्यातील जीचीएस रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. पुणे विभागात नवीन आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये दोन नवीन रुग्ण आहेत, तर मागील दिवसातील तीन रुग्णांचा समावेश आहे. ११७ रुग्णांपैकी १७२ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचे निदान झाले आहे. किमान ४० रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर ९२ रुग्ण पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. २९ रुग्ण हे पिंपरी चिंचवड नागरी हद्दीतील आहेत. तर २८ पुणे ग्रामीणमधील आहेत. १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षणं जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ची माहिती
गुइलेन-चैरै सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुइलेन-बरै सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. गुइलेन-बी सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसगांनंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच जीबीएसची इतर अनेक कारणे असतात गुइलेन-बेरै सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्णालये। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला 'जीबीएस' चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.
गुइलेन-बरे सिंड्रोमची लक्षणे
अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता /लकवा
अचानकपूणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप