तिसऱ्या अमृतस्नानासाठी प्रशासन सज्ज, मौनी अमावस्येला भाविकांवर आकाशातून पुष्पवृष्टी

Pratahkal    29-Jan-2025
Total Views |
Prayagraj
प्रयागराज : प्रयागरान येथे सुरू असलेल्या महाकुंभात उद्या, बुधवारी तिसरे अमृतस्नान (शाही) होणार आहे. मैनी अमावस्येच्या मुहूर्तावर होणाऱ्या या स्नानासाठी कोट्यवधी लोक अपेक्षित असून त्यानुषंगाने प्रशासन सज्ज आहे. कुंभमेळ्याचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर त्याला न्योतिषशास्त्रीय आधार देखील आहे. कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा येतो, न भारतातील ४ प्राचीन शहरे, हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन येथे आयोजित केला जातो. या संगमाच्या पवित्र पाण्यात पवित्र स्नान करण्याची आणि पूजा करण्याची ही सर्वांत मेठी संधी आहे. कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत मिळविण्यासानी देव आणि दानवांमध्ये १२ वर्षे युद्ध झाले. या युद्धादरम्यान ज्या ठिकाणी मडक्यातून अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या युद्धामुळे, दर १२ वर्षांनी एकदा कुंभ येतो. महाकुंभातील स्नानाला अमृत (शाही) स्नान म्हणून ओळखले जाते. २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २.३९ कोटी लोकांनी संगमात स्नान केले होते. यामध्ये सुमारे १० लाख कल्पवासी सहभागी झाले होते. तर २७जानेवारीपर्यंत आंघोळ करणाऱ्यांची एकूण संख्या १४.७६ कोटी होती. प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण ६ अमृत स्नाने होतील, महाकुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान १३ जानेवारीला, दुसरे अमृत स्नान १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीला, तिसरे स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, चौथे शाही स्नान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमेला, पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला १२ फेब्रुवारी रोजी होईल आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होईल, दरम्यान उद्या, बुधवारी २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर अमृत स्नान उत्सवानिमित्त, उत्तरप्रदेश सरकार भाविकांवर पुष्पवृष्टी करणार आहे. सर्व घाटांवर पुष्पवृष्टीची तयारी सुरू आहे. दिवसातून ५ ते ६ वेळा फुलांचा वर्षाव केला जाईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पुष्पवृष्टीचे चक्र वाडू शकते अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.