मुंबईतला पहिला रोपवे (केबल कार) मुलुंड ते एसजीएनपी (SGNP) होणार

पर्यटन विभागाची अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू

Pratahkal    06-May-2024
Total Views |
Mumbai's first ropeway
 
मुंबई: लवकरच, मुंबईला (Mumbai) एक नवीन पर्यटन स्थळ (tourist spot) मिळणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (ropeway) (केबल कार) बांधण्यात येणार आहे. तसेच त्याच्या निसर्गरम्य सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी तशी मागणी केली असून, सरकारने पर्यटन विभागाला त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे.
 
कोटेचा यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या मुलुंड विधानसभा क्षेत्रालगत च्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळच्या तीन मूर्ती मंदिरकरिता रोप वे ची सुविधा व पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याचाबत मागणी केली आहे.
 
पत्रामध्ये कोटीचा यांनी असे म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील संरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती साधारण ८७ कीमी परिघात आहे. याच राष्ट्रीय उद्यानाची पूर्वेकडील सीमा माझ्या मुलुंड मतदारसंघाला लागून आहे. मुलुंड मधील नागरीकांना आपल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे मी मुलुंडकर नागरिकांच्या वतीने ही मागणी आपणांकडे करीत आहे.
 
संजय गांधी उद्यानाच्या च्या हद्दीत सुंदर असे डोंगर असून या डोंगर माथ्यावर फार जुने तीन मूर्ती मंदीर आहे या मंदिरात भाविकांना सहज रित्या येता यावे म्हणून तिथे रोप वे व्यवस्था तसेच पर्यटकांना viewing gallery केल्यास भाविकांची व पर्यटकां ची संख्या वाढेल. या सुविधा मुळे शासनास महसूल ही मिळेल. माझ्या ह्या मागणीचा सकारात्मक विचार करून या करीता निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
 
कोटेचा यांच्या पत्रानंतर महाजन यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास करण्याचे आदेश दिले. एप्रिलमध्ये पर्यटन विभागाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, पर्यटन विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता.
 
याबाबत बोलताना कोटेचा यांनी सांगितले की सध्या भाविकांना तीन मूर्ती मंदिरापर्यंत चालत जावे लागते आणि तिथे पोहोचणे सोपे नाही. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी रोपवे बांधण्यात येणार आहे. तसेच, SGNP, संरक्षित हरित क्षेत्राला धक्का न लावता, तेथे पर्यटन स्थळ विकसित केले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
"मी त्याबाबत पर्यटन विभागाकडे तत्परतेने पाठपुरावा करेन. मी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी करणार आहे," कोटेचा पुढे म्हणाले.
 
कोटेचा हे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या काही मुद्द्यांमध्ये मुलुंड येथील बर्ड पार्क, भांडुप आणि विक्रोळीवासीयांसाठी मराठी सांस्कृतिक केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, डंपिंग ग्रा