डॉ. श्रीकांत शिंदेंनी साधला नेहरू नगर परिसरातील नागरिकांशी संवाद

Pratahkal    15-May-2024
Total Views |
Dr. Shrikant Shinde
 
कल्याण : कल्याणच्या खडेगोळवली परिसरातील नेहरू नगर येथे कल्याण लोकसभेचे महायुती शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज नागरिकांशी संवाद साधला. या परिसरात आत्तापर्यंत विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या परिसरात सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते झाले आहेत. याशिवाय कल्याणमध्ये हिंदी भाषी भवन उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी वाचनालय देखील सुरू करण्यात आले आहे. तसेच मागील २ निवडणुकांप्रमाणे यंदाही आपण महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन याप्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी नगरसेवक महादेव रायभोळे, निलेश शिंदे यांच्यासह महादेव भिसे, साई सावंत, सिद्धा र्थ रूपवते, चंद्रकांत कांबळे, महादेव शिंदे, साहेबराव राजगुरू, अशोक पवार, मोनिका रायभोळे, वंदना पाखरे, हर्षा भिसे, सुनीता सावंत आदींसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.