चित्रे व रांगोळीतून विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याविषयीचा संदेश

Pratahkal    19-Apr-2024
Total Views |
Message about voting
 
नवी मुंबई: "चला, मतदान करण्यास पुढे येऊया आपल्या देशाचा विकास करुया ", अशी मतदान विषयक जनजागृती करणारी घोषवाक्ये लिहून त्याला अनुरूप चित्रे व रांगोळी रेखाटत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना वापरत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. दिनांक २० मे २०२४ रोजी २५ ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान होत असून त्या अनुषंगाने १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीच स्वीप कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करणरे विविध उपक्रम सर्व स्तरांवर राचविण्यात येत असून देशाचे उद्याचे नागरिक असणा-या विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या पालक व नातेवाईकांपर्यंत मतदान करुन लोकशाहीतील हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे. याकरिता शाळा व महाविद्यालयांमध्ये नानाविध उपक्रम नाविन्यपूर्ण रितीने राबविण्यात येत आहेत.
 
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत शालेय पातळीवर मतदान जनजागृतीविषयक चित्रे व रांगोळी काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेच्या ५७ प्राथमिक व २३ माध्यमिक अशा एकूण ८० शाळांसह २०० हून अधिक खाजगी शाळांमध्येही चित्रे व रांगोळीच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणा-या संकल्पना चित्र व रांगोळीच्या माध्यमातून रेखाटल्या. अनेक शाळांमध्ये पालकांनीही भेटी देऊन या विद्यार्थ्याचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहीत केले. तसेच शिक्षकांमार्फत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करण्यात आली.