मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

Pratahkal    12-Apr-2024
Total Views |
Lok sabha elections 2024
 
डोंबिवली: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Lok Sabha General Election 2024) अंतर्गत कल्याण लोकसभेतील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात, मतदार जनजागृतीसाठी विविध जनजागृतीपर स्विप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे.
 
कल्याण पूर्वच्या स्विप पथकातील ( मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडेल अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ११ तारखेला विठ्ठलवाडी बस डेपोच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळील ओपन जिम, खडेगोळवली साकेत कॉलेज, खडेगोळवली १०० फुटी रोड, 'आय' प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना मतदानावे महत्व पटवून देण्यात येऊन मतदान जनजागृती करण्यात आली, सदर ठिकाणी ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजून लोकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
 
त्याचप्रमाणे राजेश्वरी पार्क सोसायटी, मलंग रोड येथे सोसायटीमधील सभासद यांचे समक्ष मतदान जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला, व सोसायटीमधील उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात आली. सोसायटीमध्ये ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृती पर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना याना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
 
अशोकनगर वालधुनी येथे ईद या सणाचे औचित्य साधून अन्सार शेख यांचे दर्गा शेजारी मतदान जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले, प्रसंगी ध्वनीक्षेपकाद्वारे मतदान जनजागृती पर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना याना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थितां समवेत मतदानाची शपथ घेण्यात आली. सदर प्रसंगी प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती दगळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.