ललित कला केंद्रातील हल्ल्याबद्दल भूमिका घेतल्यानंतर प्रियदर्शिनी इंदलकरला आले वाईट अनुभव

Pratahkal    08-Feb-2024
Total Views |
Priyadarshini Indalkar
 
पुण्यातील ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra, Pune) विद्यार्थ्यांचं मागच्या आठवड्यात रामायणातील व्यक्तिरेखा असलेलं नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकत्यांनी बंद पाडलं होतं. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपंकडून तक्रार देण्यात आली. याप्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) दुसऱ्यांदा केलेली पोस्ट (post) चर्चेत आहे. ही घटना घडल्यानंतर प्रियदर्शिनीने त्याचा निषेध नोंदवला होता. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी (instagram story) पोस्ट केली होती. या स्टोरीनंतर प्रियदर्शिनीने एक पोस्ट रिपोस्ट (repost) करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ज्यात आपल्याला निषेधाच्या पोस्टमुळे धमक्या आल्याचं तिने म्हटलं आहे. पहिल्या पोस्टमध्ये "ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध" अशी स्टोरी तिने पोस्ट केली होती.
 
आता प्रियदर्शिनीने स्टोरील लेखक व अभिनेत हितेश पोरजेने लिहिलेली पोस्ट शेअर करत लिहिलं "ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले ३-४ दिवस मला अनेक भयंकर मेसेज, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल "
 
प्रियदर्शिनीने शेअर केलेली पोस्ट नेमकी काय ?
 
"मी काही ललित कला केंद्राचा विद्यार्थी नाही. नाटक अथवा फिल्मशी संबंधित कुठल्याच इंस्टिट्यूटचा पार्ट नाही. पण गेल्या आठवड्यात झालेल्या ललित कला केंद्राच्या वादानिमित्त काही गोष्टी मनात आल्या त्या इथे मांडतोय.
 
ललित कला केंद्राच्या अनेक विद्याथ्यांना मी जवळून ओळखतो. अगदी आताच्या विद्यार्थ्यापासून ते हिंदी - मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एस्टॅब्लिश्ड अॅक्टर्सपर्यंत. विदर्भापासून ते कोकणापर्यंतच्या कित्येक छोट्या छोट्या गावांतून अनेक मुलं-मुली इथे शिकायला येतात. पुणे शहरात आपसूकपणे अंगावर येणारे सामाजिक-सांस्कृतिक गुंते मोकळे करत कष्टाने नाटकं उभी करतात, प्रयोग करतात. लोककला आणि पाश्चात्य नाट्यकलेचे प्रशिक्षण घेत खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात.
 
संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको.
 
आता सगळ्यात मोठा मुद्दा. प्रकरण इतकं मोठं झाल्यावर पुढच्या वर्षी एखादा पालक आपल्या मुला- मुलीला ललितमध्ये प्रवेश घ्यायला लगेचंच परवानगी देईल का ? नाही दिली परवानगी तर नुकसान कुणाचं ? तर अगदी आत्मियतेने नाटक-अभिनय शिकू पाहणाऱ्या निमशहरी, खेड्यातल्या मुलांचं नाटक फिल्मद्वारे जातीय आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान देण्याची गरज असतांना ही पॅरेलेल सोशल सेंसरशिप आपली मुळं आतवर रुजवणार.
 
हे असंच वाढत राहिलं तर नुकसान कुणाचं! ? तर आपल्याच समृद्ध अशा नाटक आणि सिनेमाच्या वारश्याचं. एकदा फक्त एफटीआयआय वर हल्ला करणाऱ्यांचा व्हिडिओ बघा. त्यातली मुलं बघा. पुण्याच्या आसपासची सगळी बहुजनांची पोरं. एकदा फक्त ललित कला केंद्रात तोडफोड करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची नावं वाचा.