'मोठ्या बॅनरचे चित्रपट कधीच मिळाले नाहीत' शिल्पा शेट्टीने व्यक्त केली खंत

Pratahkal    14-Sep-2023
Total Views |
Shilpa Shetty
 
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही बॉलीवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री (Famous actress) म्हणून ओळखली जाते. शिल्पाने (Shilpa) १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीगर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या अभिनेत्री तिच्या 'सुखी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने शिल्पाने नुकतीच सिद्धार्थ कन्ननच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी शिल्पाने बॉलीवूडमध्ये तिला कधीच बिग बॅनर चित्रपटांमध्ये काम करायला मिळालं नाही याविषयी भाष्य केलं. शिल्पा शेट्टी म्हणाली, 'मला कधीच अभिनेत्री असा टॅग मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये मला फक्त ग्लॅ मरस भूमिकांसाठी विचारणा केली जायची. 'मैं 'खिलाडी तू अनाडी' हा चित्रपट सुपरहिट ठरल्यावर माझं नाव आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर घेतलं जायचं. परंतु, मला कधीच स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.
 
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का नाही मिळत? याबद्दल मला कायम आश्चर्य वाटायचं. आज मी जे काही मिळवलंय, ते मोठ्या कलाकारांसह छोट्या चित्रपटांमध्ये काम करून मिळवलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये मी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, माझे चित्रपट चालले नाहीत पण, माझी सगळी गाणी हिट झाली. बॉलीवूडमध्ये फक्त मी माझ्या गाण्यांमुळे टिकून आहे.' शिल्पा शेट्टीने मोठ्या ब्रेकनंतर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हंगामा २' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं. अभिनेत्री म्हणते, 'मी कधीच पैशांसाठी काम केलं नाही. ९० च्या दशकात चित्रपट चालले नाहीत, तर निर्माते आमचं नुकसान झालं असं बोलायचे तेव्हा मी माझ्या कामाचं मानधनही घेतलं नव्हतं. तो काळ खूप वेगळा होता. ' दरम्यान शिल्पा शेट्टीचा 'सुखी' (sukhhi) चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.