महिलांना एसटी सवलतीचा कल्याणमध्ये शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

Pratahkal    20-Mar-2023
Total Views |


Shiv Sainikani
 
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी महिला सन्मान योजना, अधिवेशनामध्ये मांडली होती. यामधील एसटी (ST) प्रवासा मध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सूट असे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra state road transport board), एसटीमध्ये महिला भगिनींना ५० टक्के तिकिटामध्ये सवलत मिळण्यास सुरवात झाली आहे. 'महिला सन्मान योजना' ('Women's Honor Scheme') सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये महाराष्ट्र हद्दित वय वर्षे ५ ते ७४ वयोगटातील महिलांना कोणत्याही प्रकारच्या बसमध्ये (शहरी वाहतूक सोडून ) ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी कल्याण एसटी डेपो आगारात शिवसैनिकांच्या (Shiv Sainikani) वतीने पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महिला वाहक आणि महिला प्रवासी (Women carriers and women migrants) यांना गुलाबपुष्प देण्यात आले. तर पेढे भरवत तोंड गोड करण्यात आले. यावेळी महिला प्रवाशांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेविका माधुरी काळे, संगीता गायकवाड, सुशीला माळी, पुष्पा ठाकरे, प्रशांत बोटे, सुमेध हुमणे, भूषण यशवंतराव आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.