अनिल जयसिंघानीचा उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

Pratahkal    20-Mar-2023
Total Views |
 
Amruta Fadnavis

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीचे वडील अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाल्याने आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंघानी हा ५ राज्यात वॉन्टेड आहे, इतकेच नाही तर ८ वर्षांपासून तो फरार आहे. आता अनिल जयसिंघानी याचा एक फोटो सोशल मीडियात (Social media) व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात (Politicians of maharashtra) खळबळ उडाली आहे. अनिल जयसिंघानी याचा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आहे. अनिल जयसिंघानी याने २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्ष प्रवेशाचे त्याचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी २००२ मध्ये तो उल्हासनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा (Congress) नगरसेवक म्हणून निवडून आला होता. तर १९९५ आणि १९९७ मध्ये त्याने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सेशन कोर्टाने २१ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.. सुनावण्यात आली आहे. अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अनिक्षा अनिल जयसिंघानीला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली होती.