या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय... महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Pratahkal    17-Mar-2023
Total Views |

What is the use of the government, the poor do not live in the house...

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : या सरकारचा (Government) उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय... खावटी अनुदान न देणाऱ्या, एसटी (ST) कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट (Budget) कोलमडले... बजेटमध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... महागाई वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत जोरदार निदर्शने केली. अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.