पुन्हा चिंता वाढली !

Pratahkal    16-Mar-2023
Total Views |

Corona got worried again!

ठाणे, दि. १५ (वार्ताहर) : गेल्या आठवडाभरापासून ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मंगळवारपर्यंत ८२ अॅक्टिव्ह रुग्ण होते. बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्यात पुन्हा २४ नवे रुग्ण आढळले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली आहे. तर ठाणे शहरात १४ नवे रुग्ण आढळल्याने पुन्हा सोशल डिस्टन्स (Social Distance), हात धुणे, मास्क लावणे याकडे ठाणेकरांनी लक्ष वेधले आहे. महिनाभरापासून वातावरणातील बदल, धुळीचा त्रास यामुळे सर्दी-खोकला आणि श्वास श्वास घेण्याच्या तक्रारी नागरिकांना जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत तपासणीसाठी गेलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) सापडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. कालपर्यंत ठाणे जिल्ह्यात ८२ रुग्ण अॅक्टिव्ह होते ते वाढून आता ९८ वर पोहोचले आहेत. एकट्या ठाणे शहरात १४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ठाणेकरांची चिंता वाढविणारा हा आकडा असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे एच२एन३ (H2N2) चा प्रादुर्भावही ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २४ रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) वाढत आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात त्याचा एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते.
 
दरम्यान बुधवारी कोरोनाच्या नव्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात २४ नवे रुग्ण असून ९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, मात्र मृत्यूची एकही नोंद नाही. ठाणे शहरात १४ नवे रुग्ण, नवी मुंबईत ३, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, कुळगाव- बदलापूरमध्ये प्रत्येकी १, तर ठाणे ग्रामीणमध्ये ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आजपर्यंत ठाणे शहरात ५८ अॅक्टिव्ह रुग्ण, कल्याणात ८, नवी मुंबईत(Mumbai) १०, उल्हासनगरात ४, भिवंडीत २, मीरा-भाईंदर ३, कुळगाव-बदलापूर १, तर ठाणे ग्रामीणमध्ये १२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.