विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार !: नाना पटोले

03 Feb 2023 11:34:45
Nana Patole
 
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व पुण्यातील कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) विधानसभेची पोटनिवडणूक (Assembly Pot Nivadnuk) जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा (Congress) पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
 
प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन (Tilak Bhavan) येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam), प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आ. संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, एनएसयुआयचे आमिर शेख आदी उपस्थित होते.
 
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील व त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल.
 
Powered By Sangraha 9.0