अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitalik Mayekar) मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेकदा मितालीला या फोटोंमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.
मिताली सध्या अनेक देशांमध्ये पर्यटन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मितालीने याचे फोटोही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मितालीच्या एका फोटोवर एका युजरने 'पैसे कुठून येतात? ना सिनेमा, ना मालिका' अशी कमेंट केली होती. या युजरला मितालीने जशास तसे उत्तरही दिले होते. मात्र, आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने मिताली नक्की काय काम करते आणि तिच्याकडे पैसे कुठून येतात याबाबतचा खुलासा केला आहे.
सिद्धार्थ पुढे म्हणाला 'त्यासाठी तिची ती बौद्धिक क्षमता वापरते. एखाद्या कंपनीला हँडल करणं, त्यांच्याशी कसं बोलणं हे कसब तिच्याकडे आहे. एखाद्या फॉरेनच्या कंपनीने तिला एखादी जाहिरात शूट करून देण्यासाठी सांगितले की ती अशीच मोबाईलवर शूट करून देण्यापेक्षा ती योग्य पद्धतीने करून देते. त्यासाठी कॅमेरा सेटअप, हेअर मेकअप, लाइटिंग, व्हिडिओग्राफर या सगळ्यांसाठी ती स्वत:चे पैसे वापरते. माझ्यासाठी एखाद्या कंपनीची जाहिरात आली तर त्यांच्याशी डील करण्यासाठी सुद्धा मी तिलाच सांगतो कारण त्यांच्याशी कसं बोलावं हे मला कळत नाही पण ते ती उत्तम प्रकारे करते. या सर्व गोष्टी गेल्या सात आठ महिन्यात भरपूर प्रमाणात घडल्या आहेत आणि याचा मला अभिमान आहे कारण स्वतःच्या स्वतः सर्व गोष्टी तयार करणं फार अवघड असतं.'
मितालीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, 'मला त्यांचा बिलकुल राग येत नाही कारण हे सगळं घडतं कसं याबद्दल त्यांना काहीच माहित नसतं. कदाचित त्यांच्या जागी मी जरी असतो तरीही मला सुद्धा हेच वाटलं असतं की तू सिनेमा मालिका काही करत नाहीस मग तुझ्याकडे पैसा येतो कुठून? पण मी तिचा नवरा आहे त्यामुळे मला महित आहे की ती काय काय करत असते. जर परदेशातले क्लाइंट असतील तर ती पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्याशी डिल करत असते कारण तिकडच्या वेळा सांभाळून त्यांच्याशी बोलावं लागतं. '