डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम क्रमांकावर

Pratahkal    30-Oct-2023
Total Views |
digital payment 
 
मुंबई : डिजिटल पद्धतीने (digital way) व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम (India ranks first) क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस युपीआय (UPI) प्रणालीचा अधिकाधीक वापर करून नागरीक टेक्नोसॅव्ही झाले आहेत. २०१६ पासून सुरु झालेली प्रणाली आता सर्व स्तरांतील भारतीय नागरीक अगदी सहजपणे हाताळत आहेत. भारतात केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटपैकी ४०३ पेक्षा जास्त पेमेंट डिजिटल आहेत, ज्यात युपीआयचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा वापर ३० कोटींहून अधिक व्यक्ती आणि ५ कोटींहून अधिक व्यापारी करतात.
 
फुटपाथ वरील सामान्य विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्व स्तरांवर युपीआय चा वापर होतो. २०२२ च्या आकडेवारीनुसार, आज जगातील सर्व देशांमध्ये, भारत हा सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे, ज्याचा वाटा जवळपास ४६‍ आहे. भारतानंतर ब्राझील (brazil), चीन (china), थायलंड (thailand) आणि दक्षिण कोरियाचा (south korea) क्रमांक लागतो. सन २०१६ मध्ये केवळ एक दशलक्ष व्यवहार करणाऱ्या युपीआय ने आता १० अब्ज (१,००० कोटी) व्यवहारांचा टप्पा पार केला आहे.
 
युपीआयने भारतीयांच्या व्यवहार पद्धतीत सर्वात मोठा बदल घडवला आहे. जागतिक डेटा संशोधनानुसार, २०१७ मध्ये एकूण व्यवहाराच्या ९० टक्के असलेले रोख व्यवहार हे आता ६० टक्क्यांहून कमी झाले आहेत. सन २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्यानंतर सहा महिन्यांत, युपीआय द्वारे एकूण व्यवहाराचे प्रमाण २.९ दशलक्ष वरून ७२ दशलक्ष पर्यंत वाढले. वर्ष २०१७ सरताना, युपीआय व्यवहारात गत वर्षाच्या तुलनेत ९०० टक्क्यांनी वाढ झाली होती आणि तेव्हापासून त्याने त्याचा वाढीचा चढता आलेख कायम राखला आहे.
 
युपीआय व्यवहार वाढल्याने पेमेंटसाठी रोख रकमेची देवाणघेवाणच केवळ थांबली नाही तर इतर डिजिटल पेमेंट पद्धती देखील बदलत चालल्या आहेत. उदाहरणार्थ, व्यापारी पेमेंटसाठी डेबिट कार्डचा (Debit card) वापर वर्षागणिक घटत चालला आहे, आणि आज प्रीपेड वॉलेटचा वापर देखील युपीआय द्वारे बदलला आहे. युपीआय जसजसे निरंतर विकसित होत आहे आणि नवोन्मेष घडवत आहे, तसतसे ते भारताच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
 
युपीआयसह रूपे क्रेडिट कार्डची संलग्नता म्हणजे डिजिटल पेमेंट पद्धतीतील एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि युपीआय या दोन्हींचे एकत्र फायदे देते. युपीआय व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डद्वारे देऊ केलेल्या अल्प मुदतीच्या पत पुरवठा सुविधेचा लाभ घेऊन, कार्डधारक आता त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढण्याऐवजी त्यांच्या क्रेडिट लाइन वापरून देयक भरू शकतात.