साडेतीन शक्तीपीठांचा महिमा देशभरात दुमदुमला

महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात दुसरे पारितोषिक

Pratahkal    31-Jan-2023
Total Views |
 
Chitrarath of Maharashtra
 
 
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत (Republic Day Delhi) कर्तव्यपथावरील पथसंचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने (Chitrarath of Maharashtra) देशभरातल्या सर्वोत्तम चित्ररथामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तसेच उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' ही संकल्पना चित्ररथावर साकारण्यात आली होती.
 
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती.
 
शुभ आर्ट या नागपूर (Shubh Art, Nagpur) येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते. संगीतकार कौशल इनामदार (Composer Kaushal Inamdar) यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले.
 
तर प्राची गडकरी (Prachi Gadkari) यांनी हे गीत लिहिले. 'व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह' (Visionary Performing Arts Group) या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर करण्यात आली होती.
 
सिद्धेश व नंदेश उमप (Siddhesh and Nandesh Ump) यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.
 
महाराष्ट्र (Maharashtra) महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे.
 
महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तीपीठांची प्रतिकृती चित्ररथावर साकारण्यात आली होती. देवींच्या दर्शनातून नारीशक्तीचा जागर करण्या यावा या हेतून हा चित्ररथ साकारण्यात आला होता.
 
कर्तव्यपथावर डौलाने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने समस्त देशवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.
 
उद्या मंगळवार, ३१ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Minister of State for Conservation Ajay Bhatt) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.
 
या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची होती तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे (Vikas Kharge) यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते.