सत्तासंघर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर

Pratahkal    11-Jan-2023
Total Views |
 
 
PM Narendra Modi
 
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ चे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
 
मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. भाजपने मिशन २०२४ च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC) भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केले आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.
 
अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप (BJP) मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.